कुडाळ : 8 डिसेंबर म्हणजे जागतिक महिला दिन. दरवर्षी महिला दिनाचा कार्यक्रम फक्त माणगाव बाजार पुरताच मर्यादित असतो. पण ह्या वर्षी या कार्यक्रमाला व्यापक रूप प्राप्त झाले ते वैश्यवाणी माणगाव खोरे कार्यकारिणी मुळे. वैश्यवाणी माणगाव खोरे कार्यकारिणी पुरस्कृत हा कार्यक्रम फक्त वैश्य समाजापुरता मर्यादित न ठेवता पूर्ण माणगाव खोरे महिलांसाठी खुला ठेवण्यात आला व सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनिषा मंदार भिसे यांनी केले. त्यानंतर कार्यकारिणी सदस्यांमार्फत दीप प्रज्वलन करण्यात आले. त्याप्रमाणेच वैश्य समाज कार्यकारिणी यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
यात 1. योगिता ज्ञानेश्वर तामाणेकर, माणगाव
2. अंजली यतीन नार्वेकर,नानेली.
3. दर्शना श्रीकृष्ण पेडणेकर, माणगाव बाजार.
4. मंगल किशोर कुडतरकर, माणगाव बाजार
5.लक्ष्मी विजय केसरकर, माणगाव बाजार
6.भक्ती भरत खोचरे, घावनाळे.
7.श्रद्धा शरद नेवगी, माणगाव तिठा
8.स्वाती विजय कोरगावकर, साळगाव.
9.जानकी रामचंद्र पांगम, हळदीचे नेरूर
10. श्रीमती. आळवे, कामळेवीर
यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर महिलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. सर्वच महिलांनी अप्रतिम सादरीकरण केले. महिलांचा उत्साह तर अवर्णनीय होता. कार्यक्रम स्थळी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. महिलांनी खरेदीचा आनंदही घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शर्वरी म्हाडगुत, सौ. दुर्वा काणेकर, सौ. श्रेया कोरगावकर व कु. आर्या भर्तू यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. शर्वरी म्हाडगुत यांनी केले.
कार्यक्रम ज्या दिमाखात साजरा झाला त्यावरून लावलेलं छोट रोप वटवृक्षामधे रुपांतरित झाल्याची अनुभूती आली…
कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे आभार मानण्यात आले. ज्यांनी हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिला ते मनोज नार्वेकर यांचेही मंडळाच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले.


