मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अंमलात येणार! ; हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट. 

. वेबसाईटचे मंत्री नितेश राणे यांनी केले अनावरण!
. मटणातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात हिंदूंची होणार मटण दुकाने.

मुंबई : महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मल्हार सर्टीफिकेशन डॉट कॉम ने ही सुरुवात केली असून मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण ही एक नवीन संकल्पना आज पासून हिंदू समाजासाठी आणली जात आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्ठ मंडळाने भेट घेतली. यावेळी त्यांच्या वेबसाईटचे अनावर मंत्री नितेश राणे यांनी केले.


मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण या माध्यमातून आपल्याला हक्काचे मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाच प्राबल्य असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेली नसेल.जी काही चुकीची उदाहरणं आपल्या नजरेसमोर येत आहेत मटण मध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अमलात आणली जाणार आहे.
हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेले आहे.या झटका मटण मल्हार सर्टिफिकेशन चा वापर आपण जास्तीत जास्त करावा किंबहुना ज्या मटनाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिकडे हिंदू समाजाने खरेदी करू नये असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
यावेळी https://www.malharcertification.com/ या वेबसाईटचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी हिंदू खाटीक महासंघाचे सदस्य आकाश पलंगे,आदेश नकाते,प्रवीण साबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles