सावंतवाडी : ‘आंधळा मागतो एक डोळाआणि देव देतो दोन डोळे.!’ ही प्रचलित म्हण साकार केली आहे ती दी ग्रेट डॉ. राघवेंद्र तळेगावकर यांनी. सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अधून मधून जिल्ह्यातील आश्रमांना भेट देत असतात. अशाच एका निरवडे सिल्वर एकर येथील लिटिल सिस्टर ऑफ द पूवर आश्रमाला भेट दिली. त्या आश्रम मध्ये नऊ वृद्ध व्यक्ती आश्रय घेत आहेत तेथील सिस्टर त्या सर्व वृद्ध व्यक्तींची विनामूल्य मनोभावे सेवा व त्यांचे पालन पोषण करून जणू काही देवाची सेवा करत आहेत असा भास निर्माण करतात.
सदर सिस्टर तामिळनाडू, आंध्र प्रदेश मधील आहेत. आम्ही दिलेल्या भेटीच्या वेळी असे दिसून आले की चार वर्षांपूर्वी पासून दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली एक 84 वर्षीय निराधार वृद्ध महिलेला सदर आश्रमात आश्रय घेत होती अशा परिस्थितीत तिला सांभाळणे तेथील आश्रम चालवणाऱ्या सेवाभावी सिस्टरंना खूप अवघड जात होते. तिच्या ऑपरेशन साठी त्यांनी चार वर्षे खूप प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली असता उपस्थित सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे व हेलन निब्रे यांनी तिच्या डोळ्यांच्या ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारली.
दुसऱ्याच दिवशी रवी जाधव यांनी डॉ.राघवेंद्र तळेगावकर यांची भेट घेऊन आश्रम मधील त्या वृद्ध महिलेची सर्व हकीगत सांगितली व ऑपरेशन साठी किती खर्च येईल अस विचारणा केला असता डॉ. तळेगावकर यांनी सदर वृद्ध महिलेला उद्याच घेऊन या आपण तिच्या डोळ्याच ऑपरेशन नक्कीच करू त्यानंतर आठ दिवसातच डॉ. तळेगावकर यांनी तिच्या एका डोळ्याच ऑपरेशन केलं असता तिला दिसू लागले तर पुढच्या महिन्यातच दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन झाले त्यानंतर तिला स्पष्ट दिसू लागले. रवी जाधव यांनी ऑपरेशनचा खर्च विचारला असता डॉ.तळेगावकर म्हणाले तुमच्या सेवाभावी कार्यासाठी माझा पण थोडासा हातभार आपण हे ऑपरेशन विनामूल्य केल्याचे सांगितले.
खरंच त्या ऑपरेशनमुळे त्या निराधार वृद्ध महिलेला पुनर्जन्म मिळाला आणि पुन्हा एकदा जग पाण्याची तिची इच्छा पूर्ण झाली व दृष्टी दिलेल्यांबद्दल देवाजवळ त्यांच्यासाठी तिने प्रार्थना केली.
हे ऑपरेशन डॉ. अमित पवार कोल्हापूर यांनी यशस्वीरित्या केले त्यासाठी डॉ.राघवेंद्र तळेगावकर, डॉ. श्रद्धा परब सिस्टर तृप्ती नाईक, तळेगावकर स्टाफ मेंबर विजया सकपाल, संदीप माजगावकर यांचे देखील मोठे सहकार्य लाभले. आश्रमच्या सिस्टर मेरी अमला, सिस्टर जस्टीना ,सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम,हेलन निब्रे व प्राध्यापक गोवेकर सर यांनी डॉक्टर वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले.
खरंच त्या महिलेसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरलेले ते डॉ. राघवेंद्र तळेगावकर यांचे आज सावंतवाडी शहरांमध्ये त्यांच्या मानवतेचं कौतुक होत आहे.
ADVT –





