Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

गुढीपाडवानिमित्त राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.!

सावंतवाडी : येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळ, गवळी तिठा या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते. ही पूजा नवसाला पावणारी पूजा असेही संभवले जाते.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूजेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासंदर्भातील मीटिंग मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सोलो डान्स व ग्रुप डान्स अशी स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे तर या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय असे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये बाल गट बारा वर्षापर्यंतर व खुला गट असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे मंडळाचे सचिव दीपक सावंत 7249202691व मंडळाचे उपाध्यक्ष अरुण घाडी
735046 8655 यांच्याकडे द्यायचे आहे.
याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर,उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष अरुण घाडी, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव दीपक सावंत, सहसचिव महादेव राऊळ,ज्येष्ठ पत्रकार तथा मंडळाचे सल्लागार सिताराम गावडे, सुरेश भोकटे, यशवंत देसाई,विलास जाधव, उमेश कोळगावकर, प्रदीप नाईक, उमेश खटावकर, सुंदर गावडे, मनोज घाटकर, चिनू खानोलकर, राजेंद्र सांगेलकर, व सोनप्पा गवळी उपस्थित होते.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles