शिक्षण हेच खरे सामर्थ्य, संस्कार हीच खरी संपत्ती आणि ज्ञान हाच उज्ज्वल भविष्याचा मार्ग ! : भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी दिल्या नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त शुभेच्छा!

सावंतवाडी: आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या नव्या शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने सावंतवाडी येथील भाजपा राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

युवा नेते विशाल परब म्हणाले – “माझ्या कोकणभूमीतील तमाम विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद तसेच ज्ञानदानाच्या या पवित्र यज्ञात अविरत योगदान देणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था, त्यांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि शिक्षणप्रेमी बांधवांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आज शाळेची घंटा पुन्हा एकदा नव्या उत्साहाने निनादत आहे. नव्या वह्यांचा सुगंध, नव्या पुस्तकांची ओढ, नव्या वर्गाची उत्सुकता आणि उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन प्रत्येक विद्यार्थी ज्ञानमंदिराकडे पाऊल टाकत आहे. हे वर्ष तुमच्या आयुष्यातील यश, संस्कार, जिद्द आणि आत्मविश्वासाची नवी पर्वणी ठरो.
विद्यार्थ्यांच्या यशामागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांना, ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या शिक्षकांना आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सक्षम पिढी घडो, हीच अपेक्षा.
हे नवीन शैक्षणिक वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, प्रगती, उत्तम आरोग्य, यश आणि समाधान घेऊन येवो. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न साकार होवो, प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो आणि प्रत्येक घर ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघो, हीच ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना.!”
“शिक्षण हेच खरे सामर्थ्य, संस्कार हीच खरी संपत्ती आणि ज्ञान हाच उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे.” अशा शुभेच्छा भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी दिल्या आहेत.
📚✨ नव्या शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨📚

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles