मालवण : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,आचरे पंचक्रोशी (फेस्कॉम संलग्न) महिला गौरव पुरस्कार आचरे पिरावाडी येथील उद्योजिका मिताली प्रशांत कोरगावकर यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण २० मार्च २०२५ रोजी संघाच्या वार्षिक मेळाव्यात सकाळ सत्रात लौकिक सांस्कृतिक सभागृह (हॉटेल सिरॉक), आचरे येथे होणार आहे. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी असून प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. सुभाष दिघे, मालवण हे उपस्थित राहणार आहेत. श्रीम. कोरगावकर या उद्योजिका असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत. बचत गटाच्या प्रमुख म्हणून त्यांनी महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून संघाच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होईल, अशी माहिती जॅकारीएस फर्नांडिस, कार्यवाह जेष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशी यांनी दिली. ज्येष्ठांना डॉ. दिघे यावेळी मार्गदर्शन करणार असून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे पंचक्रोशीचा ‘स्वरयात्रा’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. दिघे यांचे हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाला सर्वांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन समारंभाचे निमंत्रक तथा उपाध्यक्ष, जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी सुरेश गावकर यांनी केले आहे.
मिताली कोरगावकर यांना ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशीचा ‘महिला गौरव पुरस्कार’ जाहीर!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


