सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नयनरम्य गाव दाणोली.., सद्गुरु साटम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पवित्र गाव दाणोली… उद्या सद्गुरु साटम महाराजांचा पुण्यतिथीचा सोहळा दाणोली येथे संपन्न होणार आहे. मात्र गेले तीन ते चार दिवस दाणोली पंचक्रोशीत विजेचा सातत्याने लपंडाव सुरू आहे. क्षणाक्षणाला वीज ये-जा करीत आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
उद्या होणाऱ्या सद्गुरु साटम महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिनी तरी वीज वितरण कंपनी नियोजन करून भाविक भक्तांना आपल्या महाराजांचे व्यवस्थित दर्शन घेता येऊ शकेल अशी व्यवस्था करेल काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संदीप सुकी यांनी ‘सत्यार्थ’ न्यूज चॅनेल जवळ व्यक्त केला आहे.
दरम्यान सातत्याने होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे दाणोली आणि पंचक्रोशीतील नागरिक तसेच भाविक भक्त प्रचंड हैराण झाले असल्याचेही श्री. सुकी यांनी सांगितले.


