सावंतवाडी : येथे नुकतेच ‘लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी’च्या रिजन कॉन्फरन्समध्ये सावंतवाडी लायन्स क्लबचे क्रियाशील लायन्स सदस्य व पदाधिकारी, सावंतवाडी शहरातील प्रतिथयश उद्योजक श्री. संदेश परब यांना ‘हेल्पफुल लायन्स’ हा किताब देऊन गौरविण्यात आले. लायन्स संदेश परब हे नेहमी सामाजिक, सांस्कृतिक व लोकापयोगी कार्यात सहभागी असतात. आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते विद्यमान अध्यक्ष असून त्यांचे आरोंदा गावातील उपक्रमातही वेळोवेळी सहभाग असतो. मोहन भोगले प्रतिष्ठान आरोंदा चे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.
यावेळी विचारमंचावर गव्हर्नर लायन्स. ॲड. पाटील, व्हाईस गव्हर्नर लायन्स. डॉ. चिखले, रिजन अध्यक्ष लायन्स संतोष चोडणकर, रिजन चेअरमन लायन्स. गजानन नाईक, लायन्स. हेमा गावसकर आदी अनेक मान्यवर लायन्स सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या या गौरवाबद्दल सावंतवाडी लायन्स आरोंदा गावातील ग्रामस्थ व नागरिकांतून अभिनंदन होत आहे.
ADVT –





