Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईकडून साहस प्रतिष्ठानच्या दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रासाठी डेक्स भेट. ; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्या शरदिनी बागवे यांचा पुढाकार.

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांची सुकन्या आर्किटेक्ट सौ. समिता पियुष सावंत हिने आपला वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा करून विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू दिल्या होत्या.
त्यावेळी साहस प्रतिष्ठानचे अध्यक्षा रूपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी 10 डेक्स उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती कारण काही दिव्यांग विद्यार्थ्यांना खाली बसायला जमत नव्हतं त्यांच्या या विनंतीला मान ठेवून संस्थेच्या सदस्या शरदिनी बागवे हिच्या पुढाकारातून श्री गिरीश कामत व श्री सुनील कामत यांच्या मार्फत निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून सुमारे 20000 रुपये किमतीचे दहा डेक्स उपलब्ध करून देण्यात आले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश बाजवे यांच्याकडून सांगण्यात आले की यापुढेही काही आमची गरज भासल्यास आम्हाला अवश्य कळवा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण 65 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, समिता सावंत,रवी जाधव, प्रवीण सूर्यवंशी विशेष शिक्षिका विदिशा सावंत सदस्या द्रोपती राऊल पालक प्रतिनिधी तनया भोगण उपस्थित होते.
यावेळी दिव्यांग केंद्राच्या अध्यक्षा सौ. रूपाली पाटील यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व निशिकांत कामात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचे आभार मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles