सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. कवठणी येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी सुदन कवठणकर यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच सुमन कवठणकर, ग्रामपंचायत सदस्य विजया कवठणकर, किनळे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक, श्रद्धा कामटेकर यांच्यासह आरोंदा विभागातील तब्बल 300 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे व आमदार दीपक कसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

तसेच यावेळी न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह राजधवण नवनाथ पार्सेकर, प्रथमेश नाईक आदींनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तसेच सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत योग्य सन्मान राखला जाईल, अशी ही ग्वाही दिली. आमदार राणे यांचा वाढदिवस सावंतवाडीत संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचे प्रवेशाबद्दल सर्वांचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनीही स्वागत केले.


