Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा होणारचं.! : संदीप गावडे यांचा ठाम विश्वास. ; ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा संपन्न, संदीप गावडे फाऊंडेशनचे आयोजन.

सावंतवाडी : गुणवत्तेच्या बाबतीत कोठेही कमतरता नसलेला तसेच सातत्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा होय. मात्र असे असतानाही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी फारसे का चमकत नाहीत?, ही सर्वात मोठी संशोधनाची बाब आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिकारी वर्गाचा जिल्हा व्हावा, यासाठी संदीप गावडे फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांसारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन संदीप गावडे संदीप गावडे फाऊंडेशनचे सर्वेसर्वा व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे यांनी केले.  बांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथे यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी संदीप गावडे बोलत होते.

    

यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती पंचायत समिती सावंतवाडी शीतल राऊळ, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, वाफोली उपसरपंच विनेश गवस, विलवडे येथील सामाजिक कार्येकर्ते प्रदीप दळवी, सरमळे सरपंच विजय गावडे, बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, विस्तार अधिकारी कृषी प्रशांत चव्हाण, गटशिक्षणाधिकारी श्रीमती बोडके मॅडम, बांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. आगलावे,  शिक्षण विस्तार अधिकारी बांदा लक्ष्मीमीदास ठाकूर, मळगाव केंद्र प्रमुख शिवाजी गावीत, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ राज्य संयुक्त सरचिटणीस म. ल. देसाई, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी तालुका अध्यक्ष विजय गावडे, सचिव रुपेश परब, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, माजी जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती नारायण नाईक, महाराष्ट्र शिक्षक समिती अध्यक्ष समीर जाधव, अॅड. सावंत, संदीप गावडे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर गावडे, सचिव दत्ता सावंत, भास्कर गावडे, कार्यकारणी सदस्य, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ, संदीप गावडे प्रेमी आदि उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनीही उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर परब यांनी केले. आभार सचिव दत्ताराम सावंत यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles