सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा – गोवा न्हयबाग पेडणे तेरेखोल खाडीच्या किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिमगोत्सवाची धूम पहायला मिळाली. न्हयबाग येथील श्री सतियादेवी मंदिरासमोर सामुदायिक गाऱ्हाणे घालून धूळ मारून सात दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता झाली.
यावेळी सर्व तरुणाई आबाल वृद्धांसह महिला युवती कडून हा सोहळा पाहण्यासाठी आणि सप्तरंगात रंगली होती.सातार्डा पुलावर सुद्धा या रंगपंचमीच्या सणामध्ये रंगलेले दिसत होते सतियादेवीच्या तेरेखोल खाडीपात्रातील
दोन खडकावर रंग मारून धुळवड साजरी करण्यात आली या सतियादेवीच्या मंदिरामध्ये बारा वाड्यांची बारा रोमटे आल्यानंतर गाऱ्हाण्यांचा कार्यक्रम झाला. श्रीफळ वाढवून सात दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगत झाली.
हा बारा रोमटांचा नाचत येणाऱ्या सोहळा पाहण्यासाठी गोवा आणि सातार्डा पंचक्रोशीतील ग्रामस्थ सातार्डा नईबाग पुलावर एकच गर्दी केली होती यावर्षीही दरवर्षीपेक्षा अधीक गर्दी पुलावर झाली होती त्याचबरोबर श्री सतियादेवीच्या मंदिराभोवती सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी करून रंग उधळण्याचा आनंद लुटला.
सातार्डा – न्हयबाग पेडणे तेरेखोल खाडीच्या किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिमगोत्सवाची जोरदार धूम !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


