सावंतवाडी : २० मार्च हा भारताच्या इतिहासातील महाडच्या चवदार तळ्याचा क्रांती दिन. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या दिवशी मानवी हक्कांसाठी महाडच्या क्रांतीभूमीत रणशिंग फुंकले. या दिनाची आठवण म्हणून आपण दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आणि सम्यक साहित्य संसद यांचे संयुक्त विद्यमाने ‘अभिवादन युगनायकाला’ – क्रांतीकारी कवितांचे अभिवाचन या विशेष कार्यक्रम आयोजन केले आहे. हा कार्यक्रम आज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत सवन्त्व्बडी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रेरणाभूमी, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन निमंत्रक दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग व सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
सावंतवाडीत आज ‘अभिवादन युगनायकाला’ कार्यक्रमाचे आयोजन. ; क्रांतीकारी कवितांचे होणार अभिवाचन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


