Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत २२ रोजी रंगणार कोमसापचे साहित्य संमेलन, साहित्य प्रेमींना मेजवानी.! : जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के. ; साहित्यप्रेमी व नागरिकांनी लाभ घ्यावा.!, कोमसापचे आवाहन.

सावंतवाडी : शहरातील ऐतिहासिक मोती तलावाच्या शेजारी असलेल्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात शनिवार दिनांक 22 मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दमदार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनाला अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून या संमेलनाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तमाम कोकणातील साहित्यप्रेमी, वाचक, विद्यार्थी वर्ग तसेच नवोदित लेखक व साहित्य क्षेत्रातील मंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले आहे. सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या पत्रकार कक्षात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, सावंतवाडी शाखाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, ऋतुजा सावंतभोसले, सौ, मिलन पालव आदि उपस्थित होते.

 

यावेळी श्री. मस्के पुढे म्हणाले, सावंतवाडी शहराला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला लेखक आणि कवींची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. यंदाच्या संमेलनाचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शाखेला मिळाला हे सौभाग्य आहे. येथील साहित्य क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या मंडळींनाकडून योग्य ते सहकार्य मिळेल आणि संमेलन यशस्वी होईल. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आमदार दीपक केसरकर असून या संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर असतील. या संमेलनास कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रांताधिकारी हेमंत निकम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या उषा परब आदि उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान ग्रंथ दिंडीचा शुभारंभ श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते सकाळी 9 वाजता केशवसुत कट्ट्यापासून होणार आहे. या संमेलनात ग्रंथ प्रदर्शन, चर्चासत्र /परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखत कसे बहुविध कार्यक्रम करणार असल्यामुळे हे संमेलन प्रत्येकासाठी ऐतिहासिक साहित्य मेजवानी ठरेल, असा आशावाद अध्यक्ष मंगेश मस्के यांनी व्यक्त केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles