सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव शिवसेना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त वेशभूषा स्पर्धा (ऐतिहासिक व पारंपरिक) व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३० मार्चला दुपारी २ वाजता कोलगाव ग्रामपंचायत येथे होणार आहे. ही स्पर्धा लहान गट (१ ते १४ वर्षे) मोठा गट (महिला व पुरुष) यांच्यात होणार आहे. यात प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षीस तसेच सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येईल. या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी २६ मार्च ही अंतिम तारीख आहे.
या स्पर्धेत जास्तीत-जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी सुशांत ठाकूर (९४२१२०७४८२), मुकेश ठाकूर (९५४५५१२०७४), नितेश पेडणेकर (९४०३०६०५७५), अभिजीत टिळवे (९८२३१४९००२), विद्येश धुरी (९४०३२९७०००) यांच्याशी संपर्क साधवा.


