सावंतवाडी : समाजातील धार्मिक व जातीय सलोखा बंधुभाव वृद्धिगंध व्हावा व या जिल्ह्याचा शांत व निसर्गरम्य असा असलेला लौकिक कायम राहावा यासाठी ‘आम्ही भारतीय’ या संस्थेच्या वतीने येथील लतीफ बेग हॉलमध्ये रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला सर्वधर्म समाजातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन ‘आम्ही भारतीय’ संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
प्रारंभी ॲड. संदीप निंबाळकर यांनी या कार्यक्रमाचा आयोजनाचे हेतू स्पष्ट केला व असे कार्यक्रमातून दोन समाजात असलेल्या भेदाभेद नष्ट होईल, असा आशावाद व्यक्त केला. तसेच या उपक्रमात सर्व समाजाने सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले व यापुढेही हा भाईचारा आपण कायम ठेवूया व जिल्ह्याचा लौकिक असाच राहील, भविष्यात पर्यटन बरोबरच विविध उद्योजक या जिल्ह्यात येतील असा आपण प्रयत्न करूया, असे आवाहन केले.
यावेळी संत साहित्याचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर, ॲड. सुहास सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, मौलाना तनवीर,ॲड. इजाज नाईक, पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण , लेखक प्रा. प्रवीण बांदेकर, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, नरेंद्र मसुरकर, रमेश बोंद्रे, प्रसाद पावसकर, बाळा बोर्डेकर, समीरा शेख, अफरोज राजगुरू, सिने अभिनेते नंदकुमार पाटील, इर्षाद शेख, जहांगीर बेग, रफिक मेमन, बजिकर मेमन , बाबा रखानजी, दादा पडवेकर, शफिक खान, महरुद्दीन करोल, यासीन मुलानी, जमीन शेख, शफिक खान, जहांगीर शेख, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, सामाजिक कार्यकर्ते कांता जाधव, रवी जाधाव, वासंती परुळेकर, पेंटर श्री. कदम, मोठ्या संख्येने नगर परिषद सावंतवाडीचे सफाई कर्मचारी, मुस्लिम भगिनी आणि मुस्लिम बांधव, हिंदू बांधव, बौद्ध बांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी सुंदरनगरीचे सुंदरीकरण कायम ठेवणाऱ्या नगरपालिकेच्या सुमारे 80 कर्मचाऱ्यांचा सन्मान भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देऊन करण्यात आला.
प्रास्ताविक जेष्ठ विधीज्ञ ॲड. संदीप निंबाळकर यांनी व सूत्रसंचालन श्री. महेश परुळेकर यांनी केले.
ADVT –



