Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

….अन्यथा ‘ते’ कामगार दिसतील तिथे ठोकून काढू.! : सीताराम गावडे यांचा स्पष्ट इशारा. ; ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ कामगारांना जिल्ह्यातून हाकलून लावण्याची श्री. गावडे यांनी केली मागणी.

सावंतवाडी  :  केवळ पोटा-पाण्यासाठी पर जिल्ह्यातून आलेले कामगार गावातील स्थानिक रहिवासी व ग्रामपंचायत सदस्याला चुकीच्या कामाचा जाब विचारला म्हणून मारहाण करत असतील तर अशा कामगारांना या जिल्ह्यात राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे कामगार दिसतील तेथे त्यांना आम्ही ठोकून काढू व या जिल्ह्यातून हाकलून लावू, पोलिसांनी याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिला आहे

कोल्हापूर गारगोटी येथील मोहिते ,चव्हाण, नामक मंडळी या जिल्ह्यात पोटापाण्यासाठी येतात व स्थानिकांलाच मारहाण करून दहशत निर्माण करतात यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा कामगारांना या जिल्ह्यात राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांना पोलिसांनी त्यांच्या मूळ गावी परत पाठवून द्यावे अन्यथा हे कामगार जिथे दिसतील तिथे त्यांना ठोकून काढू असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी सार्वजनिक विहीरीच्या कामाबाबत विचारणा करून चुकीच्या पद्धतीने लावलेला दगड काढायला सांगितला म्हणून नाटेकर एकटे असल्याचे फायदा घेऊन त्या कामगारानी त्याना जबर मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या घशाला दुखापत होऊन स्वर नलिकेत बिघाड झाला आहे, डॉक्टरानी त्यांना न बोलण्याचा सल्ला दिला आहे,स्थानिक रहिवाशाला व ग्रामपंचायत सदस्याला, लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे पर जिल्ह्यातून पोटापाण्यासाठी आलेल्या व्यक्ती मारहाण करत असतील तर जिल्ह्यातील जनता शांत बसणार नाही.पोलिसांनी याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास या व्यक्ती जिथे दिसतील तिथे त्यांना ठोकून काढू असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles