सावंतवाडी : तालुक्यातील मौजे गेळे काबुलातदार गावकर जमीन विषयी गेळे गावची बैठक झाली. या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी एक मताने ठराव घेतला कि, गेळे काबुलातदार जमीन विषयी गावची भूमिका मांडण्यासाठी गाव म्हणून श्री. संदीप एकनाथ गावडे, श्री. सागर प्रकाश ढोकरे व श्री आनंद वसंत गावडे. हेच तीन व्यक्ती गावच्या वतीने प्रशासन, शासन किंवा कोणतेही इतर अधिकारी कोणही असुदे फक्त हेच गेळे गावच्या वतीने भूमिका मांडतील. आणि गेळे गाव हे एकमताने ठरवून देत आहे. म्हणून जर कोणालाही याविषयी काही विचार किंवा काही विषय मांडायचा असेल तर गावात कोणालाही भेटून संवाद साधून काही साध्य होणार नाही. केवळ नेमणूक करून दिलेल्या व्यक्तीशी संपर्क करणे, असा गेळे ग्रामस्थांचा एक मताने ठराव झाला आहे, असे सरपंच, सर्व ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
गेळे काबुलातदार जमीनविषयी गावची भूमिका गाव म्हणून ‘हे’ तीन व्यक्ती मांडतील. ; गेळे ग्रामस्थांचा एक मताने ठराव.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


