सावंतवाडी : येथील कळसुलकर हायस्कूल सभागृहात उद्या दिनांक 28 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता कवी ग्रेस यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम ‘देणं नक्षत्राचे’ रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार तसेच माननीय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे (भाप्रसे) तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबईचे संचालक बिभीशन चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूल येथे संपन्न होणार असल्याची माहिती समन्वयक आर्यन देसाई यांनी दिली. यावेळी कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे तसेच साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचा लाभ साहित्यप्रेमी, मराठी भाषा प्रेमी, रसिक व सावंतवाडीकरांनी अवश्य घ्यावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.


