कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत निसर्ग निर्मित रंगांची कार्यशाळा पार पडली कलाशिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी नैसर्गिक वनस्पती वापर करून रंग कसे तयार करावेत याचे प्रशिक्षण इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले . झेंडूंच्या फुलां पासून केसरी रंग गुलमोहरचा पानांपासून हिरवारंग बिट पासून लाल रंग हळद व बेसन पीठ यांच्या मिश्रणातून तयार होणारा रंग अशी रंगांची उधळण तयार करण्याचे शिक्षण देण्यात आले.

या रंगांचा रंगपंचीच्या दिवशी उधळण करून रंग पंचमी साजरी केली तर आरोग्यावर कोणतेच वाईट परिणाम होणार नाहीत. आज रंगपंचमीला जे रंग वापरून खेळले जाते ते रासायनिक रंग असतात त्याचा परिणाम शरिरावर होतो आणि विविध त्वच्या विकारावर परिणाम होऊन शरीराची हानी होते . म्हणून नैसर्गिक रंगांची निर्मिती या विषयाची कार्य शाळा आयोजित करून निरोगी समाज निर्मितीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी निसर्ग निर्मित वनस्पतींचे आरोग्यदायी महत्व सांगून मार्गदर्शन केले पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी भारतीय सणांचे महत्व सांगून नैसर्गिक रंगाचे मानवी जीवनात स्थान महत्वपूर्ण कसे आहे यांचे मार्गदर्शन केले यावेळी जेष्ठ शिक्षक शेळके जे जे सरश्री सिंगनाथ सर सौ शिरसाठ मॅडम उपस्थित होते.
ADVT –



