Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

लखनौ सुपर जायंट्स विजयाच्या ट्रॅकवर, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला केलं पराभूत.

हैदराबाद : आयपीएल 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना सुरु होण्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दहशत होती. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी घ्यावी असं अनेकांचं मत होतं. पण ऋषभ पंतने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचं निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबाद धावांचा डोंगर रचणार असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. शार्दुल ठाकुरने पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादचं कंबरडं मोडलं. अभिषेक शर्मा आणि इशान किशनची विकेट काढली. त्यामुळे धावगती मंदावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेल्या. ट्रेव्हिस हेडकडून फार अपेक्षा होत्या. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. प्रिंस यादवने त्याची विकेट काढली. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक धावा केल्या. यासह विजयासाठी 20 षटकात 191 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 5 गडी गमवून 17 व्या षटकात लखनौने पूर्ण केलं.

सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिलेलं आव्हान गाठताना लखनौला पहिला धक्का बसला. संघाच्या 4 धावा असताना एडन मार्करम 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. निकोलस पूरनने 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार मारत 70 धावा केल्या. पूरन बाद झाल्यानंतर मिचेल मार्शने मोर्चा सांभाळला. त्याने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. तीन विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि आयुष बदोनी ही जोडी मैदानात राहिली. ऋषभ पंत या सामन्यातही आक्रमक आणि साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला. फक्त 15 धावा करून बाद झाला.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles