सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नं 2 शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी वैभव प्रवीण हनपाडे याने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयासाठी आपला प्रवेश निश्चित केला. त्याला वर्गशिक्षिका श्रीम. सीमा पंडित तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेल्या बुद्धिमत्ता,जिद्द, चिकाटी, मेहनत घेण्याची तयारी या गुणांच्या जोरावर त्याने हे सुयश संपादित केले. त्याने मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. ऐश्वर्या पोकळे शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक संघ, पालक वर्ग तसेच नातेवाईक यांच्याकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरवर्षी या शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत आहेत. यशाची परंपरा कायम राखत वैभवने मिळवलेल्या यशाने शाळेचा नाव लौकिक उंचावला आहे.
ADVT –