मुंबई : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, तसेच महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षा २०२४ मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ज्यांनी वयोमर्यादा ओलांडली, अशा उमेदवारांना आता एक वर्ष वाढवून देण्यात येत असल्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत सांगितली.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने संधी देण्यासाठी सरकारने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री शेलार म्हणाले, वयोमर्यादा वाढवून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारांकडून निवेदने मिळाली होती. त्यावर सकारात्मक विचार करून अराजपत्रित गट ‘ब’मधील पीएसआय व अन्य परीक्षेसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या परिस्थितीमध्ये आपण महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही एक परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ ही दुसरी व गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षा २०२४ ही तिसरी या तीन परीक्षांपैकी आपण गट ‘ब’ ही दुसरी व गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षा २०२४ या दोन परीक्षांच्या वयोमर्यादा वाढीसाठी सरकारकडे निवेदन प्राप्त झाल्यानंतर त्यावर सकारात्मक विचार करून त्यातील काही पदांसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


