मुंबई : धुळे ग्रामीण मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे युवा आमदार राघवेंद्र (रामदादा पाटील) यांची महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा समितीच्या सदस्य पदी स्तुत्य निवड झाली आहे. राघवेंद्र पाटील हे धुळे ग्रामीण मतदार संघातून मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्वात युवा आमदार म्हणून त्यांची गणना होते. राघवेंद्र पाटील यांचे आजोबा स्वर्गीय दत्तात्रय वामन पाटील हे सुद्धा तब्बल चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर त्यांचे पिताश्री बाळासाहेब उर्फ मनोहर भदाणे – पाटील हे देखील धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तर त्यांच्या आई ज्ञानज्योती मनोहर भदाणे – पाटील या धुळे पंचायत समितीच्या माजी सभापती व नगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत. शिवाय त्यांचे काका अनित पाटील हे देखील धुळे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत.
आपले आजोबा व आई – वडिलांकडून राजकीय वारसा घेतलेले राघवेंद्र पाटील हे अल्पावधीतच लोकप्रिय व अभ्यासू आमदार म्हणून आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरले आहेत. आमदार पाटील यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल त्यांचे नगाव ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पक्षाचे धुळे ग्रामीणचे व धुळे जिल्ह्याचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
ADVT –




