सावंतवाडी : येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. कोमल सत्यवान राऊळ हिची नुकतीच ‘अग्नीवीर’ (सेना मिलीटरी सर्व्हिस) म्हणून निवड झाली आहे. पुढील सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी ती बंगळुरू येथे रवाना होत आहे. कोमल राऊळ हीचे पाचवीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण आरपीडी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजकडील विज्ञान विभागात झाले. तसेच तिने शालेय कारकिर्दित राज्यपातळीवरील कबड्डीपटू म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. त्यानंतर तिने लक्ष्य ॲकॅडेमी, राधानगरी येथे मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले.
भारतीय सैन्यदलात (CMP) म्हणून दाखल होणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोमल पहिली मुलगी आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संस्था सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक श्री. पाटील सर, उपप्राचार्या डॉ. सुमेधा नाईक, तसेच सर्व शिक्षक वर्गाकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ADVT –




