Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सोने आणि चांदीची महागाईची गुढी, ग्राहकांना फटका सणासुदीत.!

मुंबई : सर्वसामान्य हिरमुसले आहेत. सोने आणि चांदीने महागाईची गुढी उभारल्याने ग्राहक हिरमुसले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने 90 हजारांचा टप्पा ओलांडला. तर चांदी एक लाख 5 हजारांच्या पुढे पोहचली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…

मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही सोन्याने मोठी झेप घेतली. सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 540 रुपयांनी स्वस्त झाले. तर बुधवारी 110, गुरूवारी 440 आणि शुक्रवारी 1140 रुपये असे एकूण 1690 रुपयांनी सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 83,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 91,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पण नाही मागे –

सुरुवातीच्या दोन दिवसात चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही. त्यानंतर तीन दिवसात चांदी 4000 रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय –

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 89,164, 23 कॅरेट 88,807, 22 कॅरेट सोने 81,674 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,873 रुपये, 14 कॅरेट सोने 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,00,892 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव –

आता सोने आणि चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles