सावंतवाडी : नगर परिषदेच्या नूतन मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांचे सावंतवाडी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेत स्वागत केले. यावेळी युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांना “मॅडम, सावंतवाडी हे खूप छान सुसंस्कृत शहर आहे. यात अजून चांगले काम करण्याची खूप संधी आहे. त्यामुळे तुम्ही चांगले काम करा, युवासेना सदैव तुमच्या पाठीशी राहील, अशी साद घातली.
दरम्यान नूतन मुख्याधिकारी यांनीही “मी सदैव विधायक कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.!” अशी ग्वाही युवा सैनिकांना दिली ‘ यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रतीक बांदेकर, देव्या सूर्याजी, विधानसभा अध्यक्ष अर्चित पोकळे, वर्धन पोकळे, साईश वाडकर, संकल्प धारगळकर, मेहर पडते, प्रथमेश प्रभू ,विनायक प्रभुझांट्ये, मिलिंद देसाई, चेतन गावडे, अनिकेत पाटणकर, सौरभ मठकर, सातुळी उपसरपंच स्वप्निल परब व इतर युवासैनिक उपस्थित होते.


