Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कलंबिस्त प्रशालेत चावडी वाचन व गणन उपक्रम संपन्न.!

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने निपुण महाराष्ट्र अभियान संपूर्ण राज्यात राबविले जात आहे. या कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तमध्ये चावडी वाचन व गणन उपक्रम संपन्न झाला. यावेळी कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, संस्था संचालक तथा प्रशालेचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर कदम,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर पावसकर, ग्रामपंचायत सदस्य दिपक जाधव,सुप्रिया राऊळ, पालक शिक्षक संघ सहसचिव सुचिता वर्दम, पालक शिक्षक संघ सदस्य महादेव मेस्त्री, हेमलता मेस्त्री, संजना बिडये, अश्विनी गोसावी, मलप्रभा गुरव, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, पालक श्रीम.दिपिका सावंत,श्रद्धा कदम , प्रशालेचे शिक्षक- शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी सुरुवातीला उपस्थित मान्यवर व पालकवर्गाचे स्वागत करुन प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकास साधण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विकसनासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या चावडी वाचन व गणन उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर प्रशालेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी चावडी वाचन व गणन उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष प्रकट उतारा वाचन व गणन क्रियांचे सादरीकरण केले. उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांच्या या कृतीयुक्त सादरीकरणाचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी उपसरपंच सुरेश पास्ते, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर पावसकर, सहसचिव सुचिता वर्दम यांनी आपले अभिप्राय नोंदवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस व प्रशालेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाचे नियोजन शिक्षिका श्रद्धा पराडकर, सूत्रसंचालन किशोर वालावलकर तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles