Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या अभिनव उपक्रमाच्या पहिल्या पुष्पाचा शानदार शुभारंभ.! ; ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी साकारला ‘संतांचा महिमा’.

कुडाळ : आज प्रत्येकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे. हल्लीचे युग जरी माहिती तंत्रज्ञानाचे असले तरी, या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली वाचन संस्कृती आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. ‘वाचाल तर वाचाल.!’, हाच संदेश आज पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या उपक्रमाच्या पहिल्या शुभारंभ पुष्प भव्य दिंडी सोहळ्यातून देण्यात आला. ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी संतांचा महिमा साकारला होता.

  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ हा अभिनव उपक्रम एप्रिल 2025 ते 31मार्च 2026 या कालावधीत विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीने झाला. या दिंडीचा शुभारंभ सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून  करण्यात आला.
वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रंथ दिंडी मिरवणूक शुभारंभ ढोल ताशांच्या गजरात व वाजत गाजत लेझीम पथकाने ग्रामपंचायत पिंगुळी ते प. पू. सदगुरू संत राऊळ महाराज मठापर्यंत काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीत जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, तहसीलदार वीरसिंग वसावे, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, दशरथ राऊळ, संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ साहित्यिक भरत गावडे, सौ. जयश्री चिलवंत, विकास कुडाळकर, वर्षा कुडाळकर, सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, आर्या बांदेकर, शशांक पिंगुळकर, केशव पिंगुळकर, सौ. ममता  राऊळ, सौ. अश्विनी गंगावणे, सौ. अंकिता जाधव, नूतन गावडे, ग्रामसेवक राजेश निवतकर, राजन पांचाळ, प्रसाद दळवी, आप्पा सावंत, गोविंद चव्हाण, सदाशिव गावडे, अश्विनी सावंत, स्वरा काळसेकर, ईशा सातार्डेकर, विनायक केरकर, सतीश माडये, वैभव धुरी, बाबली पिंगुळकर, सुभाष सावंत, श्रीमती योगिता, श्रीमती राणे, प्रिया पांचाळ, साधना माडये, रामदास सावंत, अरुण सावंत, मेघना सावंत, प्रिया आमडोसकर, नितीन पिंगुळकर, सागर वालावलकर, संदेश गावडे, बाळकृष्ण सडवेलकर, प्रवीण राऊळ, वैशाली राऊळ, मंडळ अधिकारी श्री. गुरव, साधना माडये, संपदा धुरी, माधवी मसके, मोहन पिंगुळकर तसेच परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, प. पू .विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट,  गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद,  सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग, गावातील सर्व ग्रंथाचे अध्यक्ष, प्रतिनिधी, महिला बचत गट यांची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष म्हणजे एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत एप्रिल 2025 मध्ये आज शालेय मुले व पालक यांच्यासाठी ‘मोबाईल, आजची मुले व पुस्तक’ , ‘मुलांचे हरवलेले बालपण’ याविषयी मार्गदर्शन परिसंवाद झाला.  मे व जून महिन्यातशेतकऱ्यांना कृषीविषयी मार्गदर्शन शिबीर, खते बियाणे वाटप, वृक्ष लागवड कार्यक्रम,  जुलै व ऑगस्टमध्ये आरोग्य तपासणी उपचार शिबीर,  सप्टेंबर व ऑक्टोबर 2025 ला स्वच्छता व श्रमदान शिबीर राबवणे,  नोव्हेंबर व डिसेंबर 2025 मध्ये महिलांसाठी व्यवसायभिमुख व रोजगार विषयक मार्गदर्शन व महिला बचत गटासाठी अभ्यास दौरे आयोजित करणे,   जानेवारी 2026 पिंगुळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव राबविणे, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, फेब्रुवारी 2026 मध्ये अपंग कल्याण आर्थिक व सामाजिक मागास उन्नती अभियान अंतर्गत विविध सहायता उपक्रम राबवणे आदी वर्षभर हे कार्यक्रम होणार आहेत.

‘ग्रंथ दिंडीतून संतांचा महिमा’ –

जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी ‘ग्रंथ दिंडीतून संतांचा महिमा’ साकारला होता तसेच इतर शाळांच्या मुलांनी लेझीम विविध वेशभूषा साकारत या ग्रंथ दिंडीमध्ये रंगत आणली. सामाजिक कार्यकर्ते आप्पा सावंत यांनी ग्रंथदिंडी सजावट केली होती. 

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles