Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

राजगड गरूड झेप मोहीमेच्या शिवज्योतीचे २४ ऑगस्ट रोजी धुळे येथे होणार आगमन. ; शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- भूपेश पाटील यांचं आवाहन. 

धुळे :  दिनांक 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज 99 दिवसांच्या मगर कैदेतून औरंगजेबाच्या हातावर तुरी देत स्वतः ची आणि आपल्या माणसांची यशस्वी सुटका करत आग्र्याहून निघाले. सदर घटना जगाच्या इतिहासात अतुलनीय पराक्रम, शौर्य, काटेकोर नियोजन, माणसांची निवड, शत्रूचा सखोल अभ्यास, सूक्ष्म नियोजन, प्रचंड आत्मविश्वास या सर्व गुणांचे मूर्तिमंत उदाहरण..आपले छत्रपती गरुडझेप घेत त्या कैदेतून उडाले होते. या महान पराक्रमाला 358 पूर्ण होत आहेत..गेल्या पाच वर्ष पूर्वी, शिवरायांचे पायदलाचे प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी राव गोळे यांचे 14 वे वंशज, सर्वाधिक किल्ले सर करण्याचा जागतिक विक्रम नावावर असलेले ऍडव्होकेट आबासाहेब श्री मारुती गोळे यांच्या संकलपणेतून गरुडझेप ही मोहीम सुरू झाली..त्या दिव्य कार्याचे हे 5 वे वर्ष.. ज्या मार्गाने शिव छत्रपती आग्र्याहून राजगडी परतले त्या मार्गावरून सरदार घराण्याचे वारसदार असंख्य मावळे सह शिवज्योत घेत धावत राजगडी जातात.ती ही गरुडझेप मोहीम.

शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कार्याला या पिढी पर्यंत पोहचवणे हा उद्देश, तसेच डायबिटीस, बीपी मुक्त भारत, प्रवासात हजारो लाखो वृक्षारोपण करण्याचं अमूल्य कार्य करत ही शिव ज्योत घेत धावण्याची ही मोहीम 24 ऑगस्ट रोजी आपल्या धुळे शहरात पोहचत आहे. ‘नरडाणा ते धुळे’ हे अंतर शिवज्योत घेत धावत पार पडण्याची जबाबदारी श्री भूपेश पाटील, प्रीतेश ठाकूर यांची असून नागसेन माध्यमिक विद्यालय वाडी भोकर यांचे 35 विद्यार्थी, मुख्याध्यापिका सौ. रेखा कदम मॅडम यांचे नेतृत्वात धावणार आहेत, सोबत हिंदू एकताचे श्री. मनोज घोडके, काही माजी सैनिक, शिवप्रेमी या महान कार्यात सहभागी झालेले आहेत.

ही पावन शिव ज्योत गरुडझेप मोहिमेचे मावळे दिनांक 24 ऑगस्ट सकाळी 8.30-9 वाजता श्री केशरनंदन गार्डन येथे पोहचणार आहे..शिव ज्योत स्वागत, सरदार घराण्यांचे वंशज आणि सर्व मोहिमेचे मावळे यांचे स्वागत करून शिव ज्योत पूजन होणार आहे, तरी जात पात धर्म पक्ष या भिंती तोडून केवळ शिवकार्य म्हणून विचार करणाऱ्या समस्त शिव प्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवभक्त भूपेश पाटील, मनोज घोडके यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles