सावंतवाडी : श्री कलेश्वर नाट्यमंडळ, वेत्ये आयोजित बुधवार ९ एप्रिल रोजी कलेश्वर नाट्यमंडळ वेत्ये येथे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे त्यानिमित्त जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम पारितोषिक ५,५२५ रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय ३,३२५ रुपये व सन्मानचिन्ह तृतीय २,२२५ रुपये व सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ १,१२५ रुपये व सन्मानचिन्ह तसेच उकृष्ट गायक,उकृष्ट हार्मोनियम,पखवाजवादक,तबला,झांज,कोरस प्रत्येकी ५०० रुपये व सन्मानचिन्ह ठेवण्यात आली आहे.
सहभागी संघ पुढीलप्रमाणे –
सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ,माजगाव ( बुवा – वैभव माडखोलकर ) रात्री ७.४५ वाजता श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ,न्हावेली ( बुवा – अक्षय जाधव ) रात्री ८.३० वाजता मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ,नेरुर ( बुवा – भार्गव गावडे ) रात्री ९.१५ वाजता विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ,आंदुर्ले ( बुवा – अर्थव होडावडेकर ) रात्री १० वाजता नवतरुण प्रासादिक भजन मंडळ,माणगाव ( बुवा – ओंकार कुंभार ) रात्री १०.४५ वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोसकर ) रात्री ११.३० वाजता सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ,वेंगुर्ला कोंडुरा ( बुवा – विवेक पेडणेकर ) रात्री १२.१५ वाजता श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ,जानवली कणकवली ( बुवा- दुर्गेश मिठबावकर ) हे संघ सहभागी होणार आहेत.


