सावंतवाडी : येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर यांनी गेली ४० वर्षे कुंभार समाज उत्कर्षसाठी जे योगदान दिले त्याची दखल घेऊन अमरावती जिल्हा कुंभार संघटनेने त्यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर केला होता.
दिनांक २३ मार्च रोजी शिर्डी येथे झालेल्या मासिक कुंभ विश्व दर्शनच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभार समाजाची संघटना बांधून समाजाला एकत्रित करण्याचं काम ते अनेक वर्ष करीत आहेत.त्याची दखल घेऊन ९डिसेंबर ल शिर्डी येथे झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कुंभार समाजाच्या मेळाव्यात त्यांना प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक मिळाली. या अगोदर कुडाळ तालुक्याचा समाज रत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग कुंभार समाजाकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.


