मुंबई : रेल्वे भरती मंडळाने आरआरसी साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर केली आहे. अप्रेंटिसशिप प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in किंवा थेट अप्रेंटिस पोर्टल www.apprenticeshipindia.gov.in वर अर्ज करू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ४ मे २०२५ आहे. रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच, स्टायपेंड देखील देईल.
अप्रेंटिसशिप अंतर्गत, उमेदवारांना रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत व्यावहारिकरित्या काम करण्याची संधी मिळेल. ही भरती दोन विभागांतर्गत होणार आहे. ज्यामध्ये फिटर, सुतार, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, प्लंबर, पेंटर, वायरमन अशा 933 जागा आहेत. या अप्रेंटिसशिप भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून किमान ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमधून इतर पात्रता संबंधित माहिती देखील तपशीलवार तपासू शकतात.
उमेदवारांची निवड थेट गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. जे दहावी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे तयार केले जाईल. प्रशिक्षणादरम्यान, दोन वर्षांचे आयटीआय करणाऱ्या उमेदवारांना 8 हजार 50 रुपये स्टायपेंड दिले जाईल. सुमारे एक वर्षाचा अप्रेंटिसशिप कोर्स करणाऱ्यांना 7 हजार 700 रुपये स्टायपेंड दिले जाईल.
ज्या उमेदवारांनी आधीच कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप केली आहे त्यांना पुन्हा अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करता येणार नाही. अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVT –



