सावंतवाडी : सावंतवाडी तालुका दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ, सावंतवाडी यांच्या वतीने श्री देवी माऊली मंदिर, इन्सुली येथे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता गेल्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील दशावतार कलाकार पाल्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमानंतर सावंतवाडी तालुक्यातील निवडक कलाकारांच्या संचात दशावतारी नाटकाचा दणदणीत प्रयोग सादर होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी तालुका दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघ सावंतवाडी यांच्या वतीने अध्यक्ष विलास परब, ज्येष्ठ कलावंत संतोष रेडकर, संतोष मेस्त्री, नारायण आसयेकर, बंटी कांबळी, संदीप कोणसकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकुश जाधव आदी दशावतारी कलावंत यांनी केले आहे.


