तुळजापूर : सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गवर चारचाकी गाड्या अडवून प्रवाशांना मारहाण करत लुट केल्याची घटना घडली आहे. तुळजापूर आणि धाराशिवच्यामध्ये कावलदरा येथील परिसरात पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान घटना घडली. जवळपास 4 ते 5 गाड्यांना अडवून त्यातील महिला व प्रवासी यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती. सोने, मोबाईल व इतर वस्तू चोरुन प्रवाशांना मारहाण केल्याची माहिती. 5 ते 6 जणांच्या टोळीने ही लूट केली असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी सुरु आहे.
गाड्या कशा अडवल्या?
गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे. धावत्या वाहनासमोर लोखंडी वस्तू टाकून गाड्या अडवण्यात आल्या. टायर फोडून आतील प्रवाशांची लूट करण्यात आली. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇



