Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत मुलांसाठी २८ एप्रिल ते १ मे दरम्यान ‘आवाज व अभिनय कार्यशाळा’चे आयोजन.

सावंतवाडी : येथील मुक्ताई ॲकेडमीने व्हिजन, मुंबई यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ‘आवाज व अभिनय कार्यशाळेचे’ आयोजन केले आहे. सोमवार 28 एप्रिल ते गुरुवार 1 मे रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत सावंतवाडीतील श्री. पंचम खेमराज महाविदयालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रौढ व बालनाट्य चळवळीचा चौतीस वर्षे अनुभव असलेले मुंबई येथील लेखक, दिग्दर्शक व आवाज तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर आणि स्वरुपा सामंत यांचे मार्गदर्शन मुलांना लाभणार आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार 28 ते बुधवार 30 एप्रिल रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 आणि पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार 28 ते बुधवार 30 एप्रिल रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5:30 या वेळेत आवाज, संवाद कौशल्य आणि अभिनय याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. गुरुवार 1 मे रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी मुलांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात येईल.

यापुढे मुलांसाठी बालनाट्य, गायन आणि संगीत विषयक कार्यक्रम घेणार असल्याचे मुक्ताई अकॅडेमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी सांगितले. या कार्यशाळेत नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी श्री. कौस्तुभ पेडणेकर मो.क्र. 8007382783 यांच्याशी संपर्क करावयाचा आहे.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles