सावंतवाडी : जय हनुमान मित्रमंडळ आरोस दांडेली येथे उद्या हनुमान जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यात उद्या शनिवार १२ रोजी १० वाजता श्री गायत्री हनुमान हवन पूजा सकाळी ६.३० वाजता श्री हनुमान जन्मसोहळा, सकाळी १० वाजता श्री हनुमान गायत्री हवन पूजा ,दुपारी १२ वाजता महाआरती,दुपारी १ वाजता महाप्रसाद.
तसेच संध्याकाळी ७.३० वाजता सुश्राव्य कीर्तन, महिला कीर्तनकार ह.भ.प.ऋचा संजय पिळणकर ( माणगाव ) यांचे कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.


