Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मंत्री नितेश राणे यांचा करिष्मा, उबाठा सेनेला पुन्हा धक्का.! ; ॲड. प्रसाद करंदीकरांसह पोंभुर्ले सरपंच, ग्रामपंचायत सदस्यही भाजपात.!

. धालवली, पोंभुर्ले, मालपे गावांमध्ये भाजपाचे वर्चस्व, उबाठा झाली खालसा.

देवगड : लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष व उबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख अॅड. प्रसाद करंदीकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला.

अॅड. प्रसाद करंदीकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पडेल विभाग विजयदुर्ग परिसरात भाजपाचे प्राबल्य वाढले आहे. करंदीकर यांच्या प्रवेशामुळे कोरला, धालवली, पोंभुर्ले आणि मालपे,मणचे या गावांमधील स्थानिक राजकारणात भाजपाची पकड बळकट झाली असून, उबाठा सेना संपली आहे.

त्यांच्यासमवेत पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर, उदय बावकर, मयुरी कांबळे, नितीन तेरवणकर, नैमुना शिरगावकर, सपना फाळके, राजश्री धुमाळ, पूजा समजिसकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

याशिवाय, विविध कार्यकारी सेवा सोसायटी पोंभुर्लेचे अध्यक्ष जलाल डोंगरकर, उपाध्यक्ष भगवान कांबळे, संतोष फाळके, अशोक पाडावे, राजाराम मोंडे, कृष्णा कांबळे, मोहन गाडी, लता समजिसकर, संजय पेडणेकर, मनीषा सुतार आणि सविता पेडणेकर हेही भाजपमध्ये सामील झाले.

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी आमदार अजितराव गोगटे, बाळा खडपे, प्रकाश बोडस, डॉ. मिलिंद कुलकर्णी, बंड्या नारकर, अमोल तेली आणि उत्तम बिरजे यांसारखे प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

करंदीकर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles