Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

मैदानावर आलेला विद्यार्थीच उज्वल भवितव्य घडवू शकतो ! : प्रा. राम शिंदे. ; शिर्डीत राज्यस्तरीय २- या शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशनाचे शानदार उद्घाटन.

शिर्डी  :  “खेळ खेळल्याशिवाय जीवनात खरा आनंद नाही, प्रत्येक शाळेचा शारीरिक शिक्षण शिक्षक हा त्या ‘शाळेचा कणा असतो,’ असे गौरवोद्गार परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिर्डीत व्यक्त केले. “२०१२ पासून क्रीडा शिक्षकांची भरती झालेली नाही, ही चिंतेची बाब आहे. गेल्या १३ वर्षांपासून भरती न होणं हे दुर्दैव आहे. आपण याबाबत अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे,” असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
प्रा. शिंदे शिर्डी येथील जिल्हा अहिल्यानगरमध्ये आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय शारीरिक शिक्षण शिक्षक महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील समस्यांच्या सोडवणूकीसाठी ऑलंपिक असोशिएशन प्रयत्न करले असे सांगितले.
या महाअधिवेशनात राज्यातील सर्व जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक आलेले आहेत.

प्रा. शिंदे पुढे म्हणाले, “भारताचा आदर्श नागरिक घडवण्यासाठी खेळाला महत्त्व दिलं पाहिजे. प्रत्येक २५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक असणं आवश्यक आहे. क्रीडा धोरणाला हलकं समजण्याची चूक करू नये. हे धोरण सक्षम असेल तरच देश सुखी राहील. शासन क्रीडा शिक्षकांच्या आरोग्यासाठी प्रयत्नशील आहे. कुणी ऐकत नसेल, तर मी स्वतः त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचवेन.”


“व्यायाम आणि खेळाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. राज्याला क्रीडा शिक्षकांची नितांत गरज आहे. तुमच्यात एकजूट असली पाहिजे. विनाअनुदानित शिक्षकांना अत्यंत कमी वेतन दिलं जातं, हे अन्यायकारक आहे. ग्रामसेवक व कृषी सहायकांसाठी जे धोरण आखले गेले आहे, तेच धोरण या शिक्षकांसाठीही असावं,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे स्वागत राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, उपाध्यक्ष डॉ. आनंद पवार, शिवदत्त ढवळे, प्रशांत कोल्हे, लक्ष्मण चलमले, ज्ञानेश काळे व जालिंदर आवारी यांनी केले.
शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांवर मनोगत व्यक्त केले. तर, राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी “एकजुटीमुळेच क्रीडा शिक्षक संच मान्यता प्राप्त झाला. मात्र, अजूनही अनेक समस्या प्रलंबित आहेत. आजच्या विद्यार्थ्यांचं सोशल मीडियाकडे वाढतं झुकाव चिंताजनक आहे. मैदानावर आलेला विद्यार्थीच उज्वल भवितव्य घडवू शकतो,” असे सांगितले.
कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खेळाडू कबड्डी शिवम पठारे यांचा प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले.

सकाळच्या सत्रात संतोष खैरनार यांच्या गटाने योग व प्राणायामावर आधारित प्रात्यक्षिक सादर केली.
दुपारच्या सत्रात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी “क्रीडा शिक्षकांच्या समस्या संसदेत मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमदार सत्यजित तांबे यांनी “फक्त राजकीय व्यक्तींवर विसंबू नका. पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी जागरूकतेची गरज आहे आणि ती तुमच्या माध्यमातूनच येईल,” असे मत मांडले.

“राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 – शारीरिक शिक्षण” या विषयावर मिलिंद नाईक यांनी मार्गदर्शन केले. डॉ. श्रद्धा बापट यांनी अध्यापनशास्त्रावर माहिती देत कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर केली. लक्ष्मण चलमले यांनी “ऑलिम्पिक मधील भारत ” या वर आपले मत व्यक्त केले.

अधिवेशन उदघाटनास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब, महाराष्ट्र ऑलंपिकचे सचिव नामदेव शिरगावकर,प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, शारीरिक शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावतीचे अध्यक्ष डॉ अरुण खोडस्कर, सचिव पुरुषोत्तम उपर्वट, शिवदत्त ढवळे, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव डॉ आनंद पवार, समन्वय समितीचे सचिव ज्ञानेश काळे, राजेंद्र कोहकडे, घनशाम सानप, सुनिल गागरे, नंदकुमार शितोळे, सुनील जाधव, आप्पासाहेब शिंदे, डॉ जितेंद्र लिंबकर,अशोक देवकर, अमोल जोशी, जालिंदर आवारी, अजित कदम, किशोर राजगुरू, स्वप्नील कर्पे, पवन खोडे, बबन लांडगे, सुजय बाबर, किरण हंगेकर, अशोक चांडे आदी उपस्थित होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, संघटनेचे राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, जिल्हा पदाधिकारी उत्तरेश्वर लाड,मोहन सनगाळे, तुकाराम देवकर,विठ्ठल खंडवी,श्री.साताप्पा,पाटील, अंबादास जोपळे आदी शारीरिक शिक्षण शिक्षक उपस्थित आहेत.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles