सावंतवाडी : सावंतवाडीची आरोग्य सुविधा सुधारावी, ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यासाठी शासनदरबारी प्रयत्नही सुरू आहेत आणि ते पूर्ण पण होत आले आहेत. तोवर रूग्णसेवा ही ईश्वरसेवा मानून डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी गोरगरीब जनतेसाठी स्वतः उपजिल्हा रुग्णालयात सेवा द्यावी. तसेच इतरही खाजगी रूग्णालयातील फिजीशीयन,हृदयरोग तज्ञ,न्युरोलॉजीस्ट, भुलतज्ञ यांना सरकारी रुग्णालयात सेवा देण्याची विनंती करावी. जेणेकरून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात चांगले उपचार रूग्णांना मिळतील. गोरगरीबांना चांगले, परवडतील असे उपचार रुग्णालयात उपलब्ध होतील. यासाठी डॉ. परूळेकर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन युवा सेना शहरप्रमुख निखिल सावंत यांनी केले.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


