सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी नुकतीच आंबोली येथे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली . यावेळी त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सिंधुदुर्ग बँकेचे संचालक व शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व्हिक्टर डान्टस, उबाठा सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मायकल डिसोजा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन त्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न कसे करता येतील, याबाबत विचार विनिमय करण्यात आला असल्याचे रुपेश राऊळ यांनी सांगितले.


