Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक घाटवळ यांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत.

सिंधुदुर्गनगरी : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय संलग्न नेहरू युवा केंद्र संघटनचे उपसंचालक के. के. घाटवळ (पणजी – गोवा,) यांचेकडे नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्गचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला नव तरुणांना दिशा देण्याचे काम हाती घेऊया आणि विविध उपक्रमातून दिशा देण्याचे काम करूया, असे विचार श्री. घाटवळ यांनी व्यक्त केले
या बाबत नेहरू युवा केंद्र संघटन कार्यालयाला प्राप्त झाले आहे. केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक के के घाटवळ यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा समन्वयक म्हणून काम केले होते. ते राष्ट्रीय पातळीवर एक मास्टर ट्रेनर म्हणून योगदान दिले आहे. तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय पुनर्निर्माण वाहिनी, हा १०० युवक – युवतींना घेऊन जिल्ह्यांत विविध उपक्रम राबविले होते. यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत एकाच वेळी शंभर बंधारे बांधण्यात आले होते. तसेच गुजरात भूकंप झाला त्यावेळी शेकडो युवक घेऊन महाश्रमदान शिबिरात भरीव योगदान दिले होते. जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलन, सन २००१ जनगणना पथनाट्य सादर करून जन जागृती केली होती. तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय युवा एकात्मता शिबिर घेण्यात आली.
यामध्ये देशातील अनेक राज्यातील युवक युवती सांस्कृतिक यामध्ये देशातील अनेक राज्यातील युवक युवती सांस्कृतिक देवाण घेवाण कार्यक्रम घेऊन युवकांना प्रेरणा देण्याचे उपक्रम राबविले होते साहसी शिबिरे घेतली होती. यातून अनेक युवक जिल्ह्यात घडले यामध्ये अनेक सरपंच पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य विविध पक्षाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे ही पावतो त्यांच्या कामातून दिसून आली होती.आज २३ रोजीत्यांनी पदभार स नेहरू युवा केंद्राच्या सिंधुदुर्गनगरी, कार्यालय येथे स्विकारला. या प्रसंगी युवा केंद्राचे अपेक्षा मांजरेकर, नेहरू युवा लोकसेवा केंद्राचे अध्यक्ष सुहास देसाई, वैभववाडी मंडळ भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, सचिन शेटये, योगेश लोके, रणजित रणशिंग, सहदेव पाटकर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles