दोडामार्ग : दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप फटी गवस यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. आज मंगळवारी दोडामार्ग येथील धाऊस्कर फार्म हाऊसमध्ये नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. त्यावेळी ही निवड झाली.
या निवडणुकीत सचिवपदी संदेश बाबासाहेब देसाई, उपाध्यक्षपदी ऋषिकेश सिताराम धर्णे आणि महेश यशवंत लोंढे यांचीही बिनविरोध निवड झाली. दैनिक तरुण भारत संवादचे तालुका वार्ताहर समीर रोहिदास ठाकूर यांची खजिनदार म्हणून निवड झाली आहे.
जिल्हा पत्रकार समितीचे सचिव बाळ खडपकर यांनी या निवड प्रक्रियेत निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.
अध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी सुरुवातीला इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्यातील चर्चेअंती एकमत होऊन रत्नदीप गवस यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली.
निवडणूक झाल्यानंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आणि निवडणूक निरीक्षक बाळ खडपकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रत्नदीप गवस आणि त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


