सावंतवाडी : येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथीच्या मुलांनी वर्षभर शाळेमध्ये वाढदिवस साजरे केले. त्या निमित्ताने यथाशक्ती देणगी वर्गशिक्षकांकडे जमा केली. त्याचप्रमाणे चौथीच्या मुलांचा शुभेच्छा समारंभ आयोजित केला. त्यावेळी या मुलांनी अजून काही देणगी जमा करून शाळेसाठी लेझर प्रिंटर सह झेरॉक्स मशीन खरेदी करून आज महाराष्ट्र दिनी संस्था सदस्य श्री स्वार सर, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भुरे सर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. सावंत सर, सर्व शिक्षक, पालक संघ उपाध्यक्ष उमा बांदेकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीमती रश्मी शुक्ल, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेकडे सुपूर्द केले. मुलांच्या व पालकांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल कळसुलकर प्राथमिक शाळेच्या या मुलांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.सदर कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनी संपन्न झाला.
यावेळी शाळेचे शिक्षक श्री. डी. जी. वरक, श्री. अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ, श्रीमती प्राची बिले, श्रीमती स्वरा राऊळ, श्रीमती संजना आडेलकर, श्रीमती स्मिता घाडीगावकर, श्रीमती पायशेट मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. जी. वरक यांनी केले.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


