मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरूवात झाली आहे, या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपयेच मिळणार आहेत.
मंत्री आदिती तटकरे यांनी ‘ही’ दिली माहिती
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असे आदिती तटकरे म्हणाल्या. यापूर्वी लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये देण्यात आले होते. आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचेही पैसे दिले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
…………………………………….
ADVT –


