खेड : तालुक्यातील आयनी जूवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळ ०३ मे रोजी सकाळी रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ सुभाष तांबे (रा. ता. खेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ तांचे हा आज सकाळी सुमारे १० वाजता घरातून पाण्याची बाटली घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यानंतर, मंगला एक्सप्रेसच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास आयनी जूवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळ ट्रेनची धडक बसल्याने सौरभ गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


