रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. कोकण बोर्डाचा राज्यात सर्वाधिक ९६.७४ टक्के निकाल लागला आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
विभागनिहाय निकाल –
कोकण- ९६.७४ टक्के
पुणे-९१.३२ टक्के
नागपूर- ९१.३२ टक्के
छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के
मुंबई- ९२.९३ टक्के
कोल्हापूर- ९३.६४ टक्के
अमरावती- ९१.४३ टक्के
नाशिक – ९१.३१ टक्के
लातूर – ८९.४६ टक्के
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇