४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड चाचणी.

मालवण: महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ‘सीएम चषक’ ४१ व्या युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे मुलांचा व मुलींचा जिल्हा संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी पात्र खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक खेळाडूंनी १२ जूनपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतर जन्मलेल्या खेळाडूंनाच पात्रता राहणार आहे. नावनोंदणी केलेल्या सर्व खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती व कौशल्य चाचणी (फिटनेस अँड स्किल टेस्ट) घेण्यात येणार असून, त्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे.
इच्छुक खेळाडूंनी आपली नावे नोंदविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे (मो. ९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होऊन राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.

दरम्यान, ‘सीएम चषक’ ४१ वी युथ स्टेट बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २३ ते २८ जूनदरम्यान विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles