Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

तब्बल २२ लाखांचे विदेशी मद्य जप्त, लांजा येथे दोघांना अटक ! ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई.

लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील विदेशी मद्य प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. लांजा येथे सापळा रचून पोलिसांनी गोवा बनावटीच्या २२ लाख २१ हजार ४४० रुपये किंमतीच्या विदेशी मद्यासह दोघांना अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी विदेशी मद्य विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दि. ०३ मे २०२५ रोजी लांजा शहरात गस्त घालत होते.

या दरम्यान, पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही व्यक्ती गोवा बनावटीची विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने लांजा येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोर्ले बौद्धवाडी फाटा येथे सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास एक हुंडाई कार (क्रमांक MH07-AB-1847) संशयितरित्या जाताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीतील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.
दोन पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता, त्यात विविध कंपन्यांच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ गाडीतील राजीव अंबाजी सावंत (रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) आणि प्रभू साबना कामनेती (रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २२ लाख २१ हजार ४४० रुपये किंमतीचे विदेशी मद्य आणि वाहन जप्त करण्यात आले.

आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाईसाठी लांजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्याचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी आणि अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह स.पो.फौ. सुभाष भागणे, पो.हवा/१२३८ प्रवीण खांबे, पो.हवा/३०६, गणेश सावंत, पो.हवा/१०६७ श्री. अमित कदम, पो.हवा/३३८ विक्रम पाटील, पो. हवा/९०९ विजय अंबेकर, पो.हवा/१४१० सत्यजित दरेकर आणि चा.पो.शी/२१५ अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles