सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी यांनी हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग : सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नी यांनी दरवर्षीप्रमाणे त्या हयात असल्याबाबतचा दाखला संबंधित बँक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सही व शिक्यासह प्राप्त करुन घेऊन त्यासोबत शहीद जवानांची विधवा पत्नी ओळखपत्र व आधार कार्ड, पॅन कार्डच्या छायांकीत प्रतीसह व 2 स्वत: चे फोटो या कार्यालयात दिनांक 20 मे 2025 पर्यत सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सुवर्ण महोत्सवी योजनेअंतर्गत जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून शहीद जवानांच्या पत्नीला दरमहा अनुदान अदा करण्यात येते. शासनाच्या नियमानुसार वर्षातून प्रत्येक सहा महीन्याने (दि. 31 मे व 30 नोव्हेंबर) हयातीचे दाखले घेऊनच अनुदान अदा करण्यात येते.
हयातीचे दाखले दिलेल्या मुदतीत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास दिनांक 1 जुन 2025 पासून त्यांचे मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र.02362 -228820,9322051284 वर संपर्क करावा.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles